You are currently viewing “आनंद हे स्वरूप माझे”

“आनंद हे स्वरूप माझे”

*✅ प्रत्येक माणूस एकमेकांच्या सहकार्याने, मदतीने व एकमेकांना पूरक व पोषक राहून जीवन जगत असतो.*

➡️ असंख्य लोकांचे हातभार लागतात, तेव्हाच माणसाचे जीवन सुसह्य व सुखावह होत असते. *समाजाचे हे ऋण प्रत्येक माणसाने लक्षात घेऊन “समाजपुरूषाशी” सदैव कृतज्ञ असले पाहिजे.* इतकेच न्हवे तर …..

*👏 “समाजकल्याण” साधून समाजाचे ऋण फेडण्याचे प्रत्येकाने यथाशक्ति प्रयत्न करणे आवश्यक आहे.*

*🙏”आनंद हे स्वरूप माझे”🌻*

*”कृतज्ञता आणि कृतज्ञतेने भरलेलं अंत:करण, स्मरण ह्याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे”.*

*👏 म्हणून, आई, वडील, शिक्षक, सदगुरू, समाजामधले निरनिराळे घटक हे सगळे आपल्यासाठी खूप काही करत असतात. त्यामुळे आपलं जीवन सुखकर होतं.*

दुसरं एक उदाहरण देऊन तुम्हाला हा विषय समजावून सांगतो. —

आपण कंपास पेटीतील कंपास (instrument) घेऊन मध्ये म्हणजे केंद्राच्या ठिकाणी त्याचे एक टोक ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला ज्यात पेन्सिल घातलेली असते त्या बाजूने एक वर्तुळ (circle) काढतो. *म्हणजे परीघ, केंद्र आणि हे circle ह्यांचा एकमेकांशी संबंध आहे.* संबंध असा की त्या circle च्या कक्षेत आतमध्ये जेवढं आहे ते सगळं येतं हा त्याचा अर्थ.

*➡️ तसं प्रत्येक माणूस हा केंद्रस्थानी आहे आणि समाज किंवा राष्ट्र हे circle मध्ये आहे. ….* म्हणून समाजामध्ये जे घडतं त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट आपल्यावर होत असतात. *आपण जे करतो त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम हे समाजावर होत असतात.* म्हणून समाज आणि व्यक्ती हे एकमेकांवर परिणाम करीत करीत परस्परांचं जीवन घडवित असतात किंवा बिघडवित असतात, हे आपल्या लक्षात येत नाही.

काही लोक म्हणतात, —

*आम्हाला समाजाशी काय करायचंय?*

आम्ही आमच्यापुरतं पाहतो, असे म्हणणारे बरेच लोक आहेत. बरेच म्हणजे जवळजवळ ९५ टक्के लोक असं म्हणणारे आहेत.

*आम्हाला काय करायचंय लोकांशी?*

आम्ही आपले घरामध्ये आहोत. आम्ही कोणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, आम्ही कोणाच्या भानगडीतही पडत नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही. आम्ही आमच्या ठिकाणी ठीक आहोत. *पण हे खरं नाही.*

*✅ तू समाजामध्ये राहतो आहेस आणि समाजाचं तुझ्यावर ऋण आहे, हे तू फेडलं पाहिजेस. *हे समाजाचे तुझ्यावर जे उपकार आहेत ते तू फेडले पाहिजेस. नाहीतर तू परमेश्वराच्या दरबारात गुन्हेगार ठरशील.* समाज हे तुझं circle आहे आणि समाजामधले सगळे लोक तुझ्या कक्षेत येतात.

म्हणून मला काय करायचंय, इतरांशी मला काही कर्तव्य नाही. समाजात काय घडत असेल त्याची मला पर्वा नाही. मी फक्त माझं काय ते पाहीन, *ही वृत्ती समाज धारणेला पोषक नाही आणि ह्याच्यातून कोणाचंही भलं होत नाही.* म्हणून ….

*🙏 “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ”,* असं तुकाराम महाराज म्हणतात ते सार्थ आणि यथार्थ आहे.

म्हणून आपल्या ठिकाणी “co-operation” ची संकल्पना आहे, “सहकाराची” जी कल्पना आहे ती फार चांगली आहे. ह्याच्यामध्ये *”एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” ही संकल्पना आहे ती अध्यात्माला धरून आहे. परमार्थाला धरून आहे, देव-धर्माला धरून आहे.*

✅ ह्यासाठीच आपण जीवनामध्ये *सगळ्यांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञतेने आपलं अंतःकरण ओलं झालं पाहिजे.* तुम्हाला कोणासाठी काही जरी करता आलं नाही तरी कमीतकमी इतरांना उपद्रव न देणं, इतरांना त्रास न देणं, इतरांना दुःख न देणं, आणि *शक्य असेल तेवढं इतरांना सहकार्य करणं, एवढं तरी माणूस करू शकतो. ह्यावरून जीवन कसं जगायचं हे आपल्या ध्यानामध्ये येईल.*

*👏 शुभचिंतन म्हणजे आपल्या मनामध्ये नेहमी सर्वांबद्दल कृतज्ञतेची भावना असली पाहिजे.* आपल्यावर सर्वांचं ऋण आहे आणि हे ऋण फेडण्यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण केले पाहिजेत. म्हणून …..

*➡️ शुभचिंतन करीत असतांना “सर्वांचे”, ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे आपण उपकार मानणं, स्मरण करणं आवश्यक आहे.*

*”Think of all you have to be grateful for and thank God for all your boons & bounties”. म्हणून ह्या सगळ्यांचं कृतज्ञतेने स्मरण करणं, म्हणजे शुभचिंतन.

 

*- सद्गुरू श्री वामनराव पै*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा