मुख्याधिकारी यांनी माहिती दिल्याचे ऍड निंबाळकर यांनी केले जाहीर
सावंतवाडी
शहरातील आठवडा बाजार मोती तलावाकाठी नागरिकांना व व्यापाऱ्यांना सोयीस्कर असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र बाजार हलवण्यासंदर्भात वरिष्ठांचा आदेश आल्यास आम्हाला पर्याय राहणार नाही, असे मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्याची माहिती अँड. संदीप निंबाळकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान आठवडा बाजार हलवण्यापूर्वी व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आठवडा बाजार संदर्भात नागरिकांसोबत एक विशेष बैठक घेऊन त्यांचे देखील मत जाणून घेणार असल्याचे अँड.निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी महेश परुळेकर, लक्ष्मण राठोड, मजीद मुल्ला, नाझीम पटेल, आदी उपस्थित होते.