आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून रोंबाट उत्सवाचा घेतला मनमुराद आनंद
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील नेरूर साईचे टेंब येथे पारंपारिक गावड्यांचे गोडे रोंबाट उत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी रात्री संपन्न झाला.या रोंबाट उत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.याप्रसंगी शिमग्यातील खेळे, चित्ररथ देखावे सादर करण्यात आले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही वेळात वेळ काढून या रोंबाट उत्सवाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनमुराद आनंद घेतला.कै. आणा मेस्त्री ग्रुप, विलास मेस्त्री ग्रुप, बाबा मेस्त्री ग्रुप, दिनू मेस्त्री या ग्रुपनी शिमग्यातील खेळे व आकर्षक चित्ररथ देखावे सादर केले.
याप्रसंगी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक,सिने अभिनेते दिगंबर नाईक,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, सचिन काळप,नगरसेविका सई काळप, राजू गवंडे, शेखर गावडे,रुपेश पावसकर,नेरूर सरपंच भक्ती घाडी, दाजी गावडे (गावकर), गिरीधर गावडे (गावकर),परशुराम गावडे (गावकर),भास्कर गावडे, गुरुनाथ गावडे, प्रमोद गावडे, सुनील गावडे, विनय गावडे, मंजू फडके, अमित राणे, गुरु गडकर आदी उपस्थित होते.