कणकवली
महिला दिनाचे औचित्य साधून पदर महिला प्रतिष्ठान कणकवलीतर्फे लक्ष्मी विष्णू हॉल येथे रस्सीखेच, पाककला व बेस्ट आउट ऑफ वेस्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण अशी रस्सीखेच स्पर्धा झाली. त्यामध्ये सर्व महिला संघांनी सहभाग दर्शवत लहानपण अनुभवले व बेस्ट आउट ऑफ वेस्ट या स्पर्धेत महिला स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेने विविध वस्तू तयार केल्या होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा नगरसेविका मेघा गांगण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम प्रसंगी मेघा गांगण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, नगरसेविका सुप्रिया नलावडे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, पल्लवी कर्पे, हर्षदा गवाणकर, संजीवनी पवार, प्रियाली कोदे, संजना सदडेकर, रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, दिशा अंधारी, अंकिता कर्पे, संपदा पारकर, माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर, प्राची कर्पे, लीना काळसेकर, दिशा राणे, प्रणाली चव्हाण, स्मिता पावसकर, विनिता राणे, राजश्री परब, भारती पाटील, उमा परब, संगीता बेलवलकर, पुष्पा वाळके, डॉ. सिद्धी देसाई, साक्षी वाळके, आरती वांगणकर, उज्वला धानजी, रंजना कुडरतरकर, पूजा वाळके, गार्गी कामत, आसमा बागवान, सोनाली सावंत, प्रिया वाळके, नैना मुसळे, उत्कर्षा बोभाटे, तृप्ती कांबळे आदी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियाली कोदे व आभार मेघा गांगण यांनी मानले.