You are currently viewing ती

ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित मुक्तछंद काव्यरचना*

*….ती….👉🏼*

ती लाडकी असते
कुणाची फुलराणी कुणा परी भासते
हसते, खिदळते चैतन्य आणते…
पहिली मुलगी धनाची पेटी
कुणाला घरची लक्ष्मी वाटते…
दुर्भागी असतात ते…
जे अवदसा म्हणून हिणवतात…!

यौवनात येताच…
नजरा खिळतात कोमल शरीरावर…
नजरेनेच सर्वांगावर बलात्कार होतो
गिधाडे तुटून पडतात ढोरावर तसाच..!
कधी होते अश्लील शेरेबाजी
कधी किळसवाणे घृणास्पद स्पर्श
तरीही, ती स्वतःलाच कोसते…
खरंच,
स्त्री म्हणून जन्मा येणे चूक असते का?

नवरा मुलगा आई वडील बहीण
आत्या, काकी, मावश्या सारे येतात…
पाहणे म्हणजे प्रदर्शन असते का…?
कुणाची तरी ती असते जीव की प्राण…
कुणासाठी घराण्याची शान…!
माप ओलांडून सासरी येते…
आजीसाठी नातसून, नवऱ्यासाठी बायको…
अन् कुणासाठी राबणारी बाईच…!
ती जबाबदारी घेते, निःसंशय पेलते…
घराला घरपण देते…
घराचं दर्पण बनते…
अन्नपूर्णा होऊन क्षुधा शांत करते…
सुख नांदण्या घरी दारी शेणसडा रांगोळी
द्वेष, तिरस्काराच्या अग्नीत संसारासाठी…
कधीतरी होते स्वतःच होळी…!

ती आई बनता…
अंतरी वाहतो वात्सल्याचा झरा…
स्त्री जन्माचे सार्थक होते…
तिच्यासाठी तोच आनंद खरा…
दूध पाजून बाळा वाढवते, पोसते, शिकवते…
बोट धरून चालवते, जीवनास दिशा देते…
ती स्वतः झिजते चंदनासम…
दुसऱ्यास शीतलता देण्यासाठी…
ती पत्नी होते कधी आई बनते…
बहीण बनून माया करते…
प्रेयसी होऊन प्रेम देते…
मैत्रीण हास्य पेरते…
पण तरीही…
कधीतरी, कुठेतरी…
ती उपेक्षितच राहते…
कारण,
ती “स्त्री” असते…!

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा