You are currently viewing महिला दिन

महिला दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुचिता विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*महिला दिन*

पुनव चांदण्यात न्हाऊन निघतेय वेडे मन
रोजच साजरा करते सखे मी महिला दिन

बहीण थोरली जशी तुळशीची मंजुळा
धाकटीच्या मुलाने जीवा लाविला लळा
दोन्ही भावांचे आहे ग विशालकाय मन
रोजच साजरा करते सखे मी महिला दिन

जनक पाठीराखा माझी माहेराची साठवण
विसरू कशी आईला आणिक माहेरपण
भावांची मुले आहेत ग जीव की प्राण
रोजच साजरा करते सखे मी महिला दिन

डोळी येते पाणी येता आईची आठवण
आठवते मला आता ते रम्य बालपण
वाढली ही परी माहेरी मिळाले घरपण
रोजच साजरा करते सखे मी महिला दिन

हातात दिला हात मिळाले सुखाचे क्षण
झाले मोकळे आकाश नाही कुठले बंधन
सख्याने अवघे विश्वच टाकले ग व्यापून
रोजच साजरा करते सखे मी महिला दिन

सुचिता कुलकर्णी
मीरा रोड
+91 98924 16923

 

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

प्रतिक्रिया व्यक्त करा