You are currently viewing सावंतवाडी रेल्वेस्थानकावर पुन्हा अन्याय – ॲड. संजू शिरोडकर

सावंतवाडी रेल्वेस्थानकावर पुन्हा अन्याय – ॲड. संजू शिरोडकर

सावंतवाडी

गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा ZBTT चे कारण देऊन रद्द केला व आता मूकंबिका बींदुर (कर्नाटक) ला तो देण्यात आला. हा कोणता न्याय.. जनशताब्दी दिली व त्याचा बदल्यात राजधानी एक्स्प्रेस व गरीब रथ एक्स्प्रेस दोन्ही काढून घेतल्या. Sawantwadi Railway Station-Terminus बद्दल च्या भरपूर मागण्या प्रलंबित असताना त्यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी टर्मिनस असो.. मत्स्यगंधा, मंगलोर ,मंगला एक्सप्रेस चा थांबा असो. नवीन सावंतवाडी – दादर एक्स्प्रेस असो. वसई – सावंतवाडी passenger, कल्याण – सावंतवाडी passenger असो, पेडणे – कारवार MEMU चा सावंतवाडी पर्यंत चा विस्तार असो. किंवा नागपूर मडगाव ट्रेन चा थांबा असो.. या मागण्या कधी पूर्ण होतील सांगता येत नाही. सतत चा अन्याय हा होतच आहे. कधी सिंगल ट्रॅक चे कारण, कधी electrification चे कारण देत Konkan Railway Corporation Ltd आमच्या हक्काच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत आहेत. किंबहुना दाखवली आहे. कोकण रेल्वेत कोकण कुठे आहे ही आता शोधण्याची वेळ आली आहे माननीय Suresh Prabhu साहेब जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांनी भरपूर प्रयत्न केला कोकण ला न्याय देण्याचा परंतु त्यांचा नंतर कोणी वाली नाही. कोकण रेल्वे प्रवासी संघटना चे लढवैये ज्यांचा प्रयत्नामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस ला थांबा मिळाला D K Sawant साहेब आता काळाच्या पडद्याआड गेलेत. त्यांचा आत्म्या स शांती लाभो. त्यांची उणीव सदैव भासेल.
आता सर्वांची गरज आहे एकत्र होण्याची व मुजोर कोकण रेल्वे प्रशासनाला जाब विचारून आपल्या मागण्या पूर्ण करण्याची.
Sawantwadi Terminus झाले की नाही अजून सावंतवाडीकराना देखील माहीत नसेल.येथील टर्मिनस हे एका कोड्या प्रमाणे झालेय. हे कोडे कधी सुटेल काय माहित. को रे प्रशासनाला माझी विनंती आहे की त्याने आमची सावंतवाडी च्या सबुरी चा अंत पाहू नये.तसेच आमच्या क्रोधाचा उद्रेक होऊ नये याची खबरदारी घ्यावी. माझी (सावंतवाडीकर) तमाम प्रवासी संगठना तसेच मीडिया ला विनंती आहे की त्यांनी या बद्दल काही तरी करावे या अन्यायाला वाचा फोडावी..

प्रतिक्रिया व्यक्त करा