You are currently viewing कळसुली हर्डी येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असल्याने,  ग्रा.प.सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी उपमंडल अधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर

कळसुली हर्डी येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असल्याने,  ग्रा.प.सदस्य कल्पेश सुद्रिक यांनी उपमंडल अधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर

बीएसएनएलच्या सेवेबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त

बीएसएनएल टॉवर सुस्थितीत करण्याची कल्पेश सुद्रीक मागणी

कणकवली

कणकवली तालुक्यातील कळसुली हर्डी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या उपस्थितीत उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांना कळसुली गावांतील दोन्हीं बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असलेला टॉवर सुस्थितीत करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

कळसुली बीएसएनएल टॉवर बंद झाल्यावर कळसुली गावात बीएसएनएल व्यतिरिक्त कोणतेही नेटवर्क येत नसल्याने त्याचा फटका गावातील ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय ,रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, बँक ,पोस्ट ,इत्यादींवर होत आहे.

कळसुली गावाची लोकसंख्या जवळपास 3,500 च्या आसपास असून या गावात बीएसएनएलचे दोन टॉवर असून 2 टॉवर वारंवार बंद होत असल्याने ग्रामस्थांमधून बीएसएनएलच्या सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यावेळी उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांनी कळसुली बीएसएनएलची विस्कळीत सेवा लवकरात लवकर सुस्थितीत करू असं आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले.

यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रुझाज फर्नांडीस, मोहित सावंत अक्षय मुरकर सह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा