वेंगुर्ले
शिरोडा बाजारपेठ येथील आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना भेटण्यासाठी काही दिवसापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब शिरोडा येथे आले होते त्या वेळी त्यांनी आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्याना आर्थिक मदत करु असे आश्वासन दिले होते त्यांची वचनपूर्ती म्हणून त्यांच्या कडून आज मंगळवार दि.७ मार्च २०२३ रोजी दुपारी १२ वाजता शिरोडा बाजारपेठ येथील घटनास्थळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई व भाजप वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी भेट देऊन आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यासाठी रोख रक्कम एक लाख रुपये शिरोडा वेंगुर्ले व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्या कडे सुपूर्त केली या वेळी शिरोडा व्यापारी संघटनेचे सेक्रेटरी जयवंत राय,आगीत नुकसान झालेले व्यापारी सुशील नाटेकर,अजित आरोदेंकर,साईश नाटेकर,डाॅ. प्रसाद साळगांवकर,सुमित चव्हाण,विशाल गावडे,त्याच बरोबर भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस,लक्ष्मीकांत कर्पे,भाजप मच्छीमार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दादा केळूस्कर,शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ,मनोज उगवेकर,भाजप शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर,कु.अर्चना नाईक,सौ हेतल गावडे,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी बबन आडारकर, बाळकृष्ण परब,चंद्रशेखर गोडकर,हरिश्चंद्र परब,अनिल गावडे,भाजप वेंगुर्ला तालुका महिला पदाधिकारी सौ.गंधाली करमळकर,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी जितेंद्र आजगांवकर,आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,आरवली भाजप पदाधिकारी एकनाथ साळगांवकर,भाजप हिंतचिंतक नाना नाटेकर,व्यापारी सिध्देश नाटेकर,विनित नाटेकर,समीर आरोस्कर,किरण कामत,उपस्थित होते