कांदळगावात नळपाणी योजनेसाठी ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर
मालवण तालुक्यातील कांदळगाव गावात नळपाणी योजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर झाले आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी मंजूर केला आहे. या नळपाणी योजनेचे भूमिपूजन शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
नळपाणी योजनेमुळे घराघरात पाणी पुरवठा होणार असून पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे. कांदळगावात अनेक विकास कामे आपण पूर्ण केली आहेत. येत्या काळातही उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यात येणार असून गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,शहरप्रमुख बाबी जोगी, कांदळगाव सरपंच रणजित परब, विभागप्रमुख राजेश गावकर, दिव्या बागवे, राजेंद्र कदम, मधुरा परब, अनघा कदम, जीवन कांदळगावकर, दीपक परुळेकर, अमोल परब, अनंत मेस्त्री, नंदू मेस्त्री, महेश परब, हर्षदा पाटकर, साक्षी कांदळकर, संदीप परब, प्रथमेश परब, प्रशांत परब, अमित सातार्डेकर, सविता पाटकर, निलेश मेस्त्री, यशवंत कांदळकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.