सावंतवाडी
सातार्डा मळेवाड मुख्य रस्त्यावर साटेली आरोसच्या अवघड वळणावर चिरे वाहतुक करणाऱ्या डंपरने हूल दिल्याने गाडीवरील ताबा सुटून हुंडाईची ईॲान कार एम एच ०७ क्यू ६४१६ ही रस्त्याच्या बाहेर फेकली गेली यात कारचे मोठे नुकसान झाले तर कारचे मालक डॅा सौरभ पाटील वय २९ रा . रेडी म्हारतळेवाडी हे सुदैवाने बचावले .
यावेळी डॅा पाटील यांनी याठिकाणी सदर बेकायदेशीर रस्त्यावरून बेकायदेशीर चिरे वाहतुक होत असून या अवघड वळणावर चिरे वाहतूक करणाऱ्यांनी एखादा प्रतिनिधी सुध्दा न नेमल्याने अचानक याठिकाणी समोरुन वाहने येत असल्याने भविष्यात एखाद्या अपघातात बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल केला . तसेच या सर्व बेकायदेशीर प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .