You are currently viewing तळकट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

तळकट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

दोडामार्ग

तळकट (तालुका दोडामार्ग) येथे माजी सरपंच रामचंद्र सावंत मित्र मंडळातर्फे तळकट आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा शंभरहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला . शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे- परब यांच्या हस्ते झाले मेंदु विकाराचे तज्ञ डॉ. अंबापुरकर मधुमेह तज्ञ डॉ. नंदादीप तोडणकर नेत्रतज्ञ डॉ. विशाल पाटील तळकट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तुषार चिपळूणकर यांनी रुग्णांची तपासणी केली .यावेळी क्रिकेटपटू निखिल नाईक तसेच प्रथमेश गावडे ,यश मळीक वैभव नांगरे, शुभम बोंद्रे कमी वयात समालोचनात ठसा उमटवलेले आशिष देसाई ,निवृत्त पोलीस पाटील विष्णू देसाई ,निवृत्त अंगणवाडी सेविका सुप्रिया पावसकर ,डॉक्टर तुषार चिपळूणकर, कीर्ती नांगरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामचंद्र सावंत उपसरपंच रमाकांत गवस कुब्रलचे माजी सरपंच प्रवीण परब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी तळकट सारख्या गावात रुग्णांसाठी आरोग्य शिबिर भरून चांगला उपक्रम राबवला आहे .असे उपक्रम ग्रामीण भागात राबवण्याची गरज असल्याचे मत अर्चना घारे परब यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक रामचंद्र सावंत यांनी केले आभार प्रवीण परब यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा