You are currently viewing भोसले नॉलेज सिटी येथे महिला दिनानिमित्त ‘नाते तुझे नी माझे ‘ स्पर्धेचे आयोजन

भोसले नॉलेज सिटी येथे महिला दिनानिमित्त ‘नाते तुझे नी माझे ‘ स्पर्धेचे आयोजन

आई व मुलांच्या नात्यावरचे सादरीकरण..

सावंतवाडी

_8 मार्च रोजी साजरा केला जाणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडीच्या वतीने *शनिवार, दि.11 मार्च रोजी दु. 3 वा. ‘नाते तुझे नि माझे..’* या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.._

_यामध्ये आई व मुले यांच्यातील जिव्हाळयाच्या नात्याचे सादरीकरण करावयाचे आहे. यासाठी स्पर्धेत भाग घेणाऱ्या आई व मुलगा/मुलगी यांच्या जोडीने 5 मिनिटांच्या कालावधीत वेशभूषा, अभिनय, वक्तृत्व, गाणे किंवा नृत्य यापैकी कोणत्याही माध्यमातून हे सादरीकरण करावयाचे आहे._

_तरी 5 ते 10 वयोगटातील मुले व त्यांची आई यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9967740426 / 7448187189 या संपर्क क्रमांकावर आपली नाव नोंदणी करावी. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल._

प्रतिक्रिया व्यक्त करा