वेंगुर्ला :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे विद्यापीठ सेवा पूर्ण करून विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार दिनांक 1 मार्च 2023 रोजी केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक, डॉ. राजन खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ स्थापनेमध्ये आणि विद्यापीठाला नावारूपाला आणण्यामागे विद्यापीठात कार्यरत असणारे आणि विद्यापीठात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोठे आहे. विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी हे घटक म्हणून काम करतात. त्यामुळेच विद्यापीठाचा उत्कर्ष झाला आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या यथोचित सन्मान व्हावा या उद्दिष्टाने डॉ. संजयजी सावंत, मा. कुलगुरू यांचे संकल्पनेतून हा सत्कार समारंभ करण्यात आयोजित करण्यात आला. यावेळी माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. जे एल पाटील, माजी रोग शास्त्रज्ञ डॉक्टर मोहनराव दळवी आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ राजन खांडेकर यांनी उपस्थित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ स्थापनेची मूर्तमेढ रोवताना दिलेल्या योगदानाचा उहापोह केला आणि त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉक्टर विजयकुमार देसाई व आदर प्रदर्शन श्री ललित खापरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुनील नाईक श्री विजय पेडणेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.