You are currently viewing बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बावशी महिलांचे रस्ता रोको आंदोलन सुरू!

बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बावशी महिलांचे रस्ता रोको आंदोलन सुरू!

‘बावशी’ आंदोलकांनी एसटी बस रोखून धरली!

कणकवली

अनिकेत उचले : बावशी रस्त्याची चाळण झाली आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून गावातील बहुसंख्य महिलांनी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन तोंडवली बावशी फाटा येथे सुरू केले आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी कणकवली बावशी ही एसटी गाडी रोकून धरण्यात आली असून प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

बावशी रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही मुश्किलीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रांताधिकारी, तहसीलदार, कणकवली पोलीस स्टेशन, तोंडवली बावशी ग्रामपंचायत, आमदार, खासदार यांना देण्यात आले आहे.या सर्वांनी या आंदोलनाची वेळीच दखल घ्यावी. दखल घेतली नाही आणि काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणार नाही.असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा