*डॉ.शिवचरण उज्जैनकर प्रतिष्ठानचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मोठ्यांचं जग फार वाईट असतं*
लहान पण
दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा
बालपणी चा काळ
सुखाचा
तेथे वारा नसतो
फिरकत दुःखाचा
लहान पणी जग
सारे असते
निव्वळ प्रेमाचे
तेथेच विणतात
धागे सुख दु:खाचे
बालपण आठवणी
येतो दाटून हुंदका
संपते आयुष्य तरी
कळत नाही बरका
बालपण ते रम्य
मनसोक्त जगाव
उरले आयुष्य ते
आठवणीत भोगावं
बालपणी नसे स्वार्थ
साधण्यासाठी
स्पर्धा हेवा व्देष
मोठेपणी सर्वकाही
नामशेष
मोठेपणी फक्त
नाते एक व्यवहार
नसतो निख्खळ
प्रेमाचा व्यापार
मोठ्यांच जग
फार वाईट असतं
सांगण्या साठीच
फक्त प्रेमाची गोष्ट
रोज होतो इथे
प्रेमाचा एक सौदा
प्रेमाविनाच तडफडतो
मनुष्य मोठेपणी बहूदा
म्हणून बालपण ते
घ्यावे क्षण जगून
आयूष्य पोळते पुढे
प्रेम तृष्णा लागून .
***************
मनोहर पवार .