संतप्त जमावाने रोखली गाडी; पोलीस दाखल
सावंतवाडी
सावंतवाडी रेडी मार्गावर झाराप पत्रादेवी बायपासच्या मुख्य बॉक्सेललगत गोवा येथून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या मर्सिडीज गाडीची धडक सावंतवाडीतून तळवडेच्या दिशेने जाणाऱ्या सहाआसनी रिक्षाला बसली. यानंतर उलटपक्षी मर्सिडीजमधील पर्यटकांनी सहाआसनी रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यानंतर त्याला आपल्या गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून त्याला सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनाही सदर पर्यटकांनी मारहाण केली. या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यांनी गाडी रोखून धरत संबंधितांना जाब विचारला. मात्र, त्यानंतरही ते उडवाउडवीची भाषा करू लागल्याने जमाव अधिकच संतप्त झाला. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त जमावाने संबंधितांनी जाहीर माफी मागावी व रिक्षाचालकाची नुकसान भरपाई द्यावी अशी आगही मागणी केली. प्रकरण शांत होत नसल्याचे लक्षात येताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही स्थानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमाव आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेर संबंधित पर्यटकांना पोलीस बंदोबस्तात सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
We will never accept this kind of activities in future times. Outsider’s violence is not allowed in Sindhudurg.