हि.हा. बापूसाहेब महाराजांच्या पुण्याईने पावन झालेले संस्थानकालीन नैसर्गिक सौन्दर्याने नटलेले सावंतवाडी शहर….! या सावंतवाडी शहरात गेल्या कित्येक वर्षात शहराचे भाग्यविधाते नामवंत नगराध्यक्ष होऊन गेलेत. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटलेत. काळाच्या ओघात त्यांचे कार्य आणि नाव भिंतीवर टांगलेल्या पाटीवरच मर्यादित राहीले.
संवाद मीडिया सावंतवाडी शहराची ओळख निर्माण करणाऱ्या अशा चेहऱ्यांना पुन्हा एकदा सावंतवाडीकरांच्या भेटीस घेऊन येणार आहे. सावंतवाडीचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इतिहास…. संस्थान विलीनीकरण नंतर सावंतवाडीचे पहिले नगराध्यक्ष….सुविधांपासून विकासाकडे घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाची आठवण काढणार…
