You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गौडबंगाळ….

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गौडबंगाळ….

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागात खाडीकरण व डांबरीकरण कामामध्ये मध्ये एम. पी .एम. रद्द करून केवळ बि.एम कार्पेट करण्याचे कार्यकारी अभियंता यांनी योजले आहे .तसा प्रस्ताव व सुधारित कामाचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांच्याकडे पाठवला आहे .असे सूत्रांकडून समजते यापूर्वीच तत्कालीन कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी एम पी एम साठी मंजुरी दिली होती परंतु केवळ कणकवली विभागात मध्ये यामध्ये बदल करून काही मोठ्या ठेकेदारांसाठी बीएम कार्पेट करण्याचे योजले आहे .सावंतवाडी विभागातून या प्रकारचा कुठचाही प्रस्ताव रत्नागिरी मंडळामध्ये दाखल झाला नाही म्हणजे केवळ कणकवली देवगड वैभववाडी मालवण या उपविभागातच भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे डांबराचे बी.एम. करावे असे कार्यकारी अभियंता कणकवली यांना वाटले आहे परंतु याची गरज सावंतवाडी विभागातील कुडाळ सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या ठिकाणी नसल्यामुळे या ठिकाणच्या कार्यकारी अभियंता यांनी एम. पी .एम व बी. एम असे धरूनच केलेले निविदा अमलात आणल्या आहेत याबद्दलचे गौंड बंगाल काय आहे ते नजीकच्या काळात उघडकीस येण्याची शक्यता आहे.असे शिवसेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख श्री.महिंद्र सावंत यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा