You are currently viewing वेडी प्रीत

वेडी प्रीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्रीकांत वडकुले लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वेडी प्रीत*

अशी कशी वेडी
प्रीत तुझी राधे
तूझ्या विना माझे
मन ना लागे राधे

तूझ्या बासुरीचा
मंजूळ आवाज
गोड मधुर कानी
येई कान्हा मज

तुझी सुंदरता बघून
चैन नाही पडत मला
तूझ्या विना कसा राहू
प्रश्न पडतो राधे मला

तूझ्या बासुरिच्या मधुर
आवाजानी झाले मी दंग
तूझ्या ह्रदयात राहून मी
झाले मी तुझ्यातच दंग

श्रीकांत वडकुते
रा. बाभुळगाव
जिल्हा. हिंगोली

प्रतिक्रिया व्यक्त करा