You are currently viewing कोकणात लवकरच गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा..

कोकणात लवकरच गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा..

सिंधुदुर्ग :

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघात आगामी येणाऱ्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यासाठी बुथ पातळीपर्यंत बांधणी केली आहे. या मतदार संघातून भाजपाचा उमेदवार लढणार आणि खासदारही होणार असल्याचे भाजपाचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणात लवकरच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा होणार असून रत्नागिरीत त्यांच्या उपस्थितीत सभा होण्यासाठी आग्रही असल्याचे जठार यांनी सांगितले.

येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी जठार यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, उमेश कुळकर्णी आदीं उपस्थित होते. भाजपाचा लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा सुऊ आहे. देशातील भाजपा पदाधिकारी, खासदार, मंत्री मतदार संघात जाऊन केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्यात का हे पहात आहे. प्रथम मंत्री वाडी-वस्तीवर जाऊन योजना अंमलबाजवणीची खातरजमा करत असल्याचे यावेळी जठार यांनी सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर आहे. त्यांनी या मतदार संघाच्या दौऱ्याला चिपळूण येथून सुऊवात केली. चिपळूण ते राजापूर दौरा करताना त्यांनी प्रथम चिपळूण येथे मेळावा घेतला. त्यानंतर श्री क्षेत्र पर्शुराम देवस्थानाला भेट दिली. तेथील परिसर सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. दरम्यान वालावलकर ट्रस्टच्या ऊग्णालयालाही भेट दिली. त्यांनी संर्पदंशावरील लस तयार करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत केंद्रस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन मिश्रा यांनी दिल्याचे जठार यांनी सांगितले.

या दौऱ्यात डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी कृषी क्षेत्रातील माहितीही जाणून घेतली. देवऊख पंचायत समितीत आढावा बैठक घेत जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला 150 कोटी ऊ.या योजनेतून प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. आता जलजीवन मिशनमधून प्रत्येक घरा-घरात पाणी पोहचणार असल्याचे जठार यांनी सांगितले.

केंद्र सरकाकडून दक्षिण रत्नागिरीत होणारी कामे:

►आपत्ती निवारणअंर्तगत कामांसाठी कोकणाला 3 हजार कोटी ऊ.चा निधी मंजूर

► किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत.

►निवारा शेड त्यासोबतच पायभूत सुविधाही उपलब्ध कऊन देण्यात येणार.

►लांजातील कोट येथे झाशीची राणी यांचे गाव दत्तक घेण्याची सरपंचांची मागणी.

►मिश्रा यांनी गावांतील सुविधांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या

►राजापूर हायस्कूलमध्ये सुसज्ज म्युझियम तयार करण्यासाठी चर्चा.

कसब्यात छत्रपती संभाजी महाराज भव्य पुतळा

संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. मात्र तेथे शंभर एकरात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या इतिहासाची माहिती देणारा परिसर निर्माण करण्याची मागणी केल्याचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी सांगितले. तर राज्य सरकारने यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा