सावंतवाडी
कलंबिस्त ग्रामपंचायत व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था कलंबिस्त तसेच श्री देवी पावणाई रवळनाथ फार्मर प्रोड्युसर कंपनी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 01 मार्चला सकाळी ११ वाजता कलंबिस्त ग्रामपंचायतीत जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर यांच्या हस्ते होणार आहे. कृषी व शासकीय योजनांसंदर्भातही ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर पशुसंवर्धन योजनांबाबत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, पशुधन सहाय्यक आयुक्त अजित मंळीक हे पशुसंवर्धन योजनांबाबत माहिती देणार आहेत. तर नाबार्डचे जिल्हाधिकारी अजय थट्टे, गोकुळचे दूध संकलन अधिकारी अनिल शिखरे व विस्तार सुपरवायझर भगवंत गावडे तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, दूध व्यवसायिक, उत्पादक शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसेवक फाले व.दूध संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत व प्रोड्युसर कंपनीचे प्रमोद नाईक, दिनेश सावंत यांनी केली