You are currently viewing व्यथा मराठीची

व्यथा मराठीची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वृत्त लवंगलता*(८-८-८-४)
*व्यथा मराठीची*

अआइईची कास सोडुनी एबीसीडी लिहिली
मायमराठीच्या पायाची भरणी कच्ची झाली

शब्दाशब्दांमध्ये जेव्हा गोड इंग्रजी वाटे
आई बाबा विसरून घरी पप्पा मम्मी आली

बाळा सोन्या म्हणता राजा स्विटू होउनी गेला
लेक लाडकी शिकुनी इंग्लिश संस्कार नवे ल्याली

काना मात्रा वेलांटी अनुस्वार झाले परके
शाळा पडल्या ओस मराठी कुणी न त्यांना वाली

आन बान अन् शान मराठी अभिमानाने बोला
बोल मराठी उच्चारुन का दर्जा उतरे खाली?

नाना शब्दालंकारांनी भाषा माझी सजली
अभंग भारुड ओवी गौळण लालित्याने न्हाली

लाज बोलण्या का वाटावी माय मराठी अमुची?
गर्व बाळगा तुम्ही मराठी उदरामध्ये शिकली

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा