सिंधुदुर्गनगरी
सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील महालक्ष्मी आर्केड व इमारती मधील तळमजल्यावरील सदनिका क्र. 2 चा परिसर, सालईवाडा येथील ज्युलिएट कॉम्प्लेक्सचे तळमजल्यावरील फ्लॅट क्र. 1 पुरता पूर्व बाजूस-1 मीटर, पश्चिम बाजूस-2.5 मीटर, उत्तर बाजूस-2.5 मीटर, दक्षिण बाजूस-2 मीटर असा 70 चौ.मी.चा परिसर, दिनांक 4 नोव्हेंबर 2020 पर्यंत, जिमखाना येथील वार्ड डी, जिमखाना मैदान मैदानाजवळ, लाखे वस्ती, बेळगाव रोड, पासून 40 मीटर अंतरावर असलेले घर क्र डी/141/16 चा 25 चौ.मी. परिसर दिनांक 5नोव्हेंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी तालुक्यात मौजे बांदा- रामनगर येथील घर क्र. 1264 चा 05 मीटर परिसर, दिनांक 4 नोव्हेंबर 2020 मौजे तळवडे- कुंभारगाव येथील घर क्र. 1189 चा 20 मीटर परिसर, मौजे बांदा-काळसेवाडी येथील घर क्र. 307 चा 05 मीटर परिसर, दिनांक 5 नोव्हेंबर 2020 पर्यंत, मौजे बांदा-देऊळवाडी येथील घर क्र.323 चा 05 मीटर परिसर दिनांक 6नोव्हेंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी तालुक्यात मौजे माडखोल-डुंगेवाडी येथील घर क्र. 107,अ, चा 10 मीटर परिसर, दिनांक 9 नोव्हेंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन मध्ये संबंधित दिनांकास रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.