वेंगुर्ले :
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिरोडा बाजारपेठेत आगीत जळून नुकसान झालेल्या दुकानांना भेट दिली. यावेळी त्या नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी करून राष्ट्रवादीच्या मदतीने त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात आली.
बाजारपेठेत आगीत जळून नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करून संबंधित व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय पुन्हा नव्याने उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्वरित मदत करण्यात आली. शिरोडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे ही मदत सुपूर्त करण्यात आली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, माजी आमदार शंकर कांबळी, राष्ट्रवादी उद्योग व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी उपसभापती सिद्धेश परब, उपसरपंच चंदन हादकी, ग्रा. पं. सदस्य मयूरेश शिरोडकर हे उपस्थित होते.