You are currently viewing बांदा रोटरॅक्ट च्या वतीने बांदकेंद्रशाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा

बांदा रोटरॅक्ट च्या वतीने बांदकेंद्रशाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा

बांदा

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ येथे ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी रोटरॅक्टच्या वतीने पाहिलीत शिकत असलेल्या ५० विद्यार्थ्यांना अंकलिपी व मराठी भाषिक कथांची पुस्तके वितरीत करण्यात आली तसेच मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी मराठी भाषिक कविता, भाषण, समूहगीत सादर केले. यावेळी स्वरचित कविता सादर करणार्‍या सर्वज्ञ वराडकर, दुर्वा नाटेकर, नैतिक मोरजकर व हर्ष नाईक यांना रोटरॅक्ट बांदा यांच्या वतीने विशेष कथा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. यादिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता हावभाव युक्त सादर करून सर्वांची मने जिंकली.
यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा चे अध्यक्ष रो अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव रो अवधूत चिंदरकर, रो दत्तराज चिंदरकर, रो रोहन कुबडे, रो मुईन खान, रो अंजली सावंत व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर उपशिक्षक जे. डी .पाटील व शिक्षक उपस्थित होते. रोटरॅक्ट बांदाने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश निलेश मोरजकर व पालकांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा