काश्मीरच्या धरतीवर सह्याद्री पट्ट्यातील नद्यांचा प्रवाह आणि त्यांचा विकास कसा करता येईल यातून जागतिक पर्यटन विकास येत्या काळात सह्याद्री पट्ट्यातील दशक्रोशीच्या भागात विकसित होईल या दृष्टीने पर्यटन प्रकल्प आंबोली- चौकूळ – गेळे- कलंबिस्त – पारपोली भागात राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाइन बोलताना दिली. आंबोली,चौकूळ ,गेळे या जमिनीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच हा प्रश्न निकाली निघेल असे त्यांनी सुचवाच केले. श्री केसरकर यांनी आज सावंतवाडीतील विविध विकासकामां संदर्भात ऑनलाइन कार्यकर्त्यांशी बातचीत केली . आपण मतदार संघात दर आठवड्याच्या शनिवार-रविवारी दौरा करू असे स्पष्ट केले होते. परंतु आपली प्रकृती ठीक नसल्याने आणि आपण कोल्हापूर व मुंबईचा पालकमंत्री असल्याने आपल्यावर अनेक जबाबदारी आहेत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्या पार करताना मतदारसंघातील लोकांशी संपर्क साधणे आणि गाठीभेटी घेणे शक्य होत नाही. परंतु वेळात वेळ काढून आपण निश्चितपणे मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने थेट संपर्कात आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. आपण या मतदारसंघातील गावागावातील रस्ते आधी कामांसाठी 70 कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणले आहेत सह्याद्री पट्ट्यातील गावे एकमेकांशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच ही गावे एकमेकांशी जोडली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पारपोली , कलंबिस्त ही गावं एकमेकांशी जोडली जाणार आहेत यासाठी रस्त्याची कामेही सुरू आहेत. सह्याद्री पट्टा या भागाच्या विकासाच्या दृष्टीने पर्यटन दृष्ट्या कसा विकास करता येईल यासाठी आपण प्रयत्न आहे असे ते म्हणाले.