कुडाळ
पाच मजली इमारतीवरुन कोसळल्यामुळे परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज सायंकाळी येथील नाबरवाडी परिसरात घडला. वनवारी सहानी (वय २१) असे त्याचे नाव आहे. तो मुळे उत्तर प्रदेश येथील रहिवाशी आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान याबाबत तेथील नागरिकांनी इमारतीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस हवालदार मंगेश शिंगाडे करीत आहेत.