You are currently viewing भाजपाच्या बुथ सशक्तीकरण अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हास्तर प्रशिक्षण बैठक संपन्न

भाजपाच्या बुथ सशक्तीकरण अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हास्तर प्रशिक्षण बैठक संपन्न

*भाजपाच्या बुथ सशक्तीकरण अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हास्तर प्रशिक्षण बैठक संपन्न*

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाची बुथ सशक्तिकरण अभियानाची बैठक शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी मंडल प्रशिक्षण वर्ग तसेच शक्ती केंद्र विस्तारक व बुथ समिती सदस्यांच्या बैठकांच्या आयोजना संदर्भात मार्गदर्शन केले .तसेच शक्तीकेंद्र अल्पकालीन विस्तारक यांच्या १० दिवसांच्या विस्तारक कार्यक्रम विषयी मार्गदर्शन केले . तसेच मंडल प्रशिक्षण वर्गाच्या विषयाबद्दल माहीती दिली .
या बैठकीत महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे , प्रज्ञा ढवण , राजश्री धुमाळे, दादा बेळणेकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई – अशोक सावंत – मनोज रावराणे , जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई व नाथा नाडकर्णी व राजन चिके , जिल्हा प्रवक्ते संजु परब व बाबा मोंडकर , जिल्हा चिटणीस मनोज नाईक व निलेश सामंत , अनु.जाती मोर्चाचे चंद्रकांत जाधव , मंदार कल्याणकर , चारूदत्त देसाई , राजेंद्र म्हापसेकर , शिक्षक आघाडीचे सुरेश चौकेकर , प्रमोद कामत , प्रकाश राणे , संजय वेंगुर्लेकर, बंड्या सावंत *मंडल अध्यक्ष* — कुडाळ – विनायक राणे , ओरस – दादा साईल , सावंतवाडी – अजय गोंधावळे , आंबोली – रविंद्र मडगांवकर , बांदा – महेश धुरी , दोडामार्ग – सुधीर दळवी , कणकवली – कानडे , देवगड – संतोष किंजवडेकर , पडेल – अमोल तेली , मालवण- विजय केनवडेकर जिल्हा कार्यालयीन मंत्री समर्थ राणे, जिल्हा सोशल मिडिया प्रमुख समीर प्रभुगावकर, महेश मांजरेकर,मधुकर देसाई,विनोद सावंत, तसेच प्रत्येक मंडलातील सरचिटणीस उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा