सिंधुदुर्गनगरी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दीतीने भरण्यासाठी दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणांच्या महाविद्यालयातील अनुचुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता जिल्हाच्या ठिकाणातील हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व इ. 12 वी तसेच इ. 11 वी व इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ दि.10 मार्च 2023 अखेर करण्यात येत आहे. या विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे दूरध्वनी क्रमांक 02362 228882 वर संपर्क साधावा.