*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी लिखित अप्रतिम काव्यरचना*
गाणं
ओल्या काळजात
गीत
ओलं ओलं झालं जी
ओल्या पापणीत
आसू
थेंब झिरमाट झालं जी
इंद्रधनु सप्तरंगी
रंग
झिरमिर बरसलं जी
आल्हाद गारवारा
गाणं
सरगम सूर न्हालं जी
फुल सुगंधित
गंध
रानभर सांडलं सांडलं जी
हिरव्या हिरव्या मनात
रान
चिंब चिंब भिजलं जी
गंध मातीचा ह्दयी
श्वासी
टच्च भरलं भरलं जी
शब्द पेरीत गाण्यात
मन
धरण भरलं भरलं जी
मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.