You are currently viewing सोनवडे दुग्ध संस्थेसाठी सर्वोतपरी सहकार्य करणार-आ. वैभव नाईक

सोनवडे दुग्ध संस्थेसाठी सर्वोतपरी सहकार्य करणार-आ. वैभव नाईक

विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ कळसुली या संस्थेची झाली नोंदणी*

*आ. वैभव नाईक यांच्या हस्ते नोंदणीचे प्रमाणपत्र चेअरमन काशीराम घाडी यांच्याकडे सुपुर्द*

दूध हा शेतीपूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ कळसुली या कृषी संस्थेची स्थापन केली आहे. सध्या या संस्थेच्या माध्यमातून १०० लिटर दूध संकलन केले जाते. यात वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचक्रोशीत या संस्थेची व्याप्ती वाढवावी. त्यासाठी लागणारे सर्वोतपरी सहकार्य केले जाईल. आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघ देखील सिंधुदुर्गातील दुग्ध संस्थाना सहकार्य करत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाकडे वळावे आणि आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सोनवडे येथे केले.
विठ्ठलादेवी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्या.सोनवडे तर्फ कळसुली ता. कुडाळ हि नूतन कृषी संस्था स्थापन झाली असून १६ फेब्रवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाकडे संस्थेची नोंदणी झाली आहे. नोंदणीचे प्रमाणपत्र आ. वैभव नाईक यांच्या हस्ते चेअरमन काशीराम घाडी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख महेश सावंत, उपतालुका प्रमुख सचिन कदम, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे,गुरु मेस्त्री, रुपेश घाडी,काशीराम घाडीगावकर,उत्तम बांदेकर, संतोष घाडीगावकर, भिकाजी घाडी, शरद घाडी,धनुर्धर घाडी, शारदा घाडीगावकर,संदिप घाडी, दीपक घाडी,विनोद घाडीगावकर,भिकाजी घाडीगावकर, सदाशिव गुरव, मोहन घाडी, उत्तम घाडी, शरद घाडी, दीपक घाडीगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा