बांदा
महाराष्ट्र शासनाने राज्यातील तरूणाई व सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे राज्यगीत म्हणून शासनाने स्विकारले आहे या गीताचा बांदा केंद्र शाळेत अंगीकार करण्यात आला.
बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व पारंपरिक वेशभूषा करून हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनी दिनी शाळेत सामुहिक गायन केले.तसेच या दिवशी मंडळांनी साजऱ्या केलेल्या शिवजयंती कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून या गीतांचे गायन करून जनजागृती केली.
या उपक्रमात मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, बांदा सरपंच प्रियंका नाईक, ग्रामपंचायत सदस्य , तरूण मंडळाचे सदस्य,प्राध्यापक रूपेश पाटील, बांदा शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर,रंगनाथ परब,जे.डी.पाटील, शुभेच्छा सावंत ,वंदना शितोळे,जागृती धुरी, प्राजक्ता पाटील, शितल गवस, प्रशांत पवार ,गोपाळ साबळे हे सहभागी झाले होते.