माजी खासदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न
कुडाळ
कुडाळ नगरपंचायतीसाठी यावर्षी नगरोत्थान निधीमधून ४ कोटी ७७ लाख ५० हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे गेल्या ४ वर्षात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी भाजपच्या माध्यमातून मंजूर झाला आहे असे पत्रकार परिषदेत भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी सांगून हा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे.
कुडाळ नगरपंचायतीसाठी यावर्षी नगरोत्थान मधून जो निधी मंजूर झाला आहे तो गेल्या चार वर्षात एवढा मोठा निधी मंजूर झाला नव्हता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला असून यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे सहकार्य लाभले आहे. शहरांमधील विविध विकास कामांना हा निधी मिळाला आहे हा निधी देत असताना सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव भाजपच्या माध्यमातून झालेला नाही. शहराच्या विकासाला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. असेही या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, सरचिटणीस बंड्या सावंत, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक अभी गावडे, निलेश परब, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे, संजय परब, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.