*काव्यनिनाथ साहित्य मंच, पुणे सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री कविता वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वप्ने कवेत घेताना*
स्वप्ने कवेत घेताना
गाणे गावे आनंदाचे
कल्पतरू मनामध्ये
जणू उगवे सोन्याचे -1
धुंदी होउनी मनात
फुटू पालवी लागते
निसर्गाने मग त्याचे
सुंदरसे गाणे होते -२
हवीहवी स्वप्नमय
अशी ही दुनिया सारी
कण घेउनी सोनेरी
देऊ मनाला उभारी-३
स्वप्ने पाहून मनात
बाग फुलवू फुलांची
वेदनांना झटकूनी
टाकूयात कायमची -४
स्वप्ने देतात मनाला
अशी नवीन उभारी
स्वप्नफुले गंधाळून
मग पडतात दारी-५
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक