You are currently viewing चिंदर भटवाडी, त्रिंबक, डिकवल, कुमामे या ४ गावांमध्ये जिओ टॉवर मंजूर

चिंदर भटवाडी, त्रिंबक, डिकवल, कुमामे या ४ गावांमध्ये जिओ टॉवर मंजूर

खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती

सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जिओ टॉवर मंजूर झाले आहेत. त्यातील मालवण तालुक्यात ४ जिओ टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी, त्रिंबक, डिकवल, कुमामे या गावांमध्ये नव्याने जिओ टॉवर उभारण्यात येणार आहेत.अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
अलीकडेच खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून १६० बी. एस. एन. एल. टॉवर मंजूर झाले आहेत. बी. एस. एन. एल. बरोबरच सिंधुदुर्ग जिल्हात जिओ ग्राहकांची संख्या जास्त असून गावातील नागरिकांना जिओ नेटवर्कची समस्या जाणवत असल्याने खा. विनायक राऊत यांनी सिधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या २० ठिकाणी जिओ टॉवर मंजूरी साठी दिले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० जिओ टॉवरना मंजुरी मिळाली आहे. त्यातील ४ टॉवर मालवण तालुक्यात मंजुर झाले आहेत.त्याबद्दल खा.विनायक राऊत यांचे हरी खोबरेकर यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा