बांदा
बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम यांच्या कन्या संजना पांगम हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज ओळखून केंद्राला बेडशीट प्रदान करण्यात आल्या.
संजना पांगम सध्या कोल्हापूर येथे फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असून त्यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड निर्माण झाली आहे. आपल्या आई, वडिलांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याचे तिने सांगितले. या सामाजिक जाणीवेतून तीने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बेडशीट प्रधान केल्या.
यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम कुमारी संजना पांगम,फार्मासिस्ट विराज परब, श्री.राऊत,सौ.म्हाडगुत, अमित गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.