You are currently viewing जाऊ नको दूर असा…

जाऊ नको दूर असा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

   *जाऊ नको दूर असा…*

 

जाऊ नको दूर असा सांग कशी समजाऊ

चांदण्या त्या फुलल्या किती गीत कोणते गाऊ…

 

प्रिय मला तू किती चांगले तू जाणतो

म्हणूनी का छळशी मला तू मजशी भांडतो

रडवेली फुलवेल सांग कुठे मी जाऊ …

जाऊ नको दूर असा….

 

हृदयी तुझ्या राहते मी खोटे का सांगतो?

आकाशी हसतो कसा बघना तू चांद तो

चांदण्यात रमतो कसा आपण तेथे जाऊ

जाऊ नको दूर असा…

 

तू राजा मी राणी स्वप्न असे पाहिले

अधुरे का राजा ते सांग असे राहिले?

मधुराणी मीच तुझी कशी तुज समजाऊ?

जाऊ नको दूर असा…

 

वेड असे प्रेमाचे साऱ्यांस का रे लागते?

स्वप्नभंग होऊनी ते अधुरे का राहते?

स्वर्गसुखाला या दृष्ट तू ही नको ना लावू…

जाऊ नको दूर असा ….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि.१९ फेब्रुवारी २०२३

वेळ: रात्री ११/१६

प्रतिक्रिया व्यक्त करा