वेंगुर्ला :
शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाच्या अनेक दिवसापासून रुग्णाकडून अनेक विषयांवर तक्रारी येत होत्या. यासाठी रेडी जि.प.परिषद भाजप कडून वरिष्ठ पातळीवर समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मागणी होत होती. यांची दखल घेऊन आज शनिवार दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता अचानकपणे रेडी जि.प.परिषद भाजप पदाधिकारी सह भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक मा.डाॅ.अमेय देसाई व भाजप सिंधुदूर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथे ज्याच्याकडे उपजिल्हा रुग्णालयांची जबाबदारी असलेले डाॅक्टर उपलब्ध नसल्यामुळे तेथे सेवेत असलेले उपलब्ध डाॅ.पंकज पाटील यांची भेट घेऊन शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या समस्या जाणून घेऊन त्याबद्दल विस्तृत चर्चा केली व या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य खात्याची संपर्क करुन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. त्या वेळी शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात *डायलेसिस सेंटर* सुरु व्हावे यांची सुध्दा मागणी रेडी जि.प.भाजप व शिरोडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य मयूरेश शिरोडकर यांच्याकडून करण्यात आली.
या वेळी रेडी जि.प.माजी सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य मयुरेश्वर शिरोडकर, कु.अर्चना नाईक, सौ.हेतल गावडे, भाजप रेडी, शिरोडा, आरवली शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे जगन्नाथ राणे, विदयाधर धानजी, महादेव नाईक, भाजप शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर गुरुजी, अनिल गावडे, बाळकृष्ण परब, भाजप शिरोडा शहर भाजप पदाधिकारी विकास परब, जितेद्र आजगांवकर व भाजप पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित राहून चर्चा केली