You are currently viewing नमस्कार त्रयोदशी”

नमस्कार त्रयोदशी”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित प.पू. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पट्ट शिष्य पूजनीय श्री ब्रह्मानंद महाराज यांचे जीवनावर त्यांचे जन्मदिनानिमित्त*

*”नमस्कार त्रयोदशी”*

जाळीहाळ ग्रामी अनंत जन्म घेती
सुसंस्कृत कुळी अवतरती विभूती
वेद शास्त्री विद्या विभूषित होती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!1!!

गुरु शोधार्थ इंदुरास पोहोचती
गुरुदर्शनाने समाधान पावती
गुरु अनुग्रह मिळे परीक्षेअंती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!2!!

नसे बाल क्रीडा दुजा छंद त्याला
अनंत शास्त्री ज्ञात झाले जगाला
अर्पिली विद्या गुरुचरणावरती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!3!!

बनशंकरी त्यांचे कुलदैवत
व्यंकटापुरी करिती तप सिद्ध
गुरु आज्ञे नाम अन्नदान करती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!4!!

समर्थानुयायी महाराज सिद्ध
श्री गुरु प्रपंची वैराग्य सांभाळीत
बुवा गुरु प्रेमांत सर्वस्व अर्पिती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!5!!

महाराजांचे पट्ट शिष्य विनम्र
गोंदवल्यांत नियोजती नित्यक्रम
महाराजांचे दास ब्रीद जपती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!6!!

नरपुर रथपुर वेणुपुरांत
तेरा कोटी जप हर ग्रामी सिद्ध
महाराजांचे साक्षीनं संकल्प पूर्ती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!7!!

बुवांचे कार्य होतं थोर महान
स्थापिती राम मंदिरे गुरु आज्ञेनं
रामनामाचा बहुप्रसार करती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!8!!

आईसाहेब बुवांना मानती सूत
अनंत श्रींचे चरणी लीन होत
मोक्षप्राप्तीचे रहस्य उलगडती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!9!!

लोकोद्धारा साठी प्रवचन करती
अंतरी सर्वदा वसे नाम भक्ती
बुवांनी लावली गोडी नामाप्रती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!10!!

ब्रह्मचैतन्यांची आस ब्रह्मानंद जाण
गुरु शिष्य दोन्ही होत अंतर्ज्ञान
बुवांचे हृदयी महाराज वसती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!11!!

खरी रामनिष्ठा खरा ब्रह्मचारी
विदेही पणे वागला देह धारी
श्री रामचिंतनी जीवन अर्पिति
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!12!!

समाधि घेतली बुवांनी कृष्णे काठी
कागवाड गणेश वाडी सरहद्दी
नव बागेत गुरु शाश्वत असती
नमस्कार श्री ब्रह्मानंद मूर्ती!!13!!

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा