You are currently viewing चॅटजीपीटी – अखेर एआईचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) पर्व सुरु ?

चॅटजीपीटी – अखेर एआईचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) पर्व सुरु ?

*चॅटजीपीटी – अखेर एआईचे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) पर्व सुरु ?*

तुम्ही कधी निरिक्षण केलंय का? जेंव्हा तुम्ही गूगल वर एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी सर्च करता तेंव्हा तुमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर सुद्धा त्या किंवा त्यासारख्या गोष्टींचे जाहिराती येतात. ह्या सिस्टिमला रेकमेंडेशन अल्गोरिदम असे म्हणतात. ही सिस्टिम तुम्ही इंटरनेट वर लाईक केलेले पोस्ट, फॉलो केलेले पेजेस, तुम्ही पाहिलेले व्हिडिओ, तुमचे गूगल सर्च ह्या सगळ्या बाबींची माहिती ठेवते आणि यावर मशीन लेअर्निंगच्या सहाय्याने तुम्हाला विविध उत्पादनांच्या जाहीराती तुमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर दिसतात. अशी ही रेकमेंडेशन आणि टार्गेटेड ऍडव्हर्टायझिंग सिस्टिम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच एक उदाहरण आहे.


तुम्ही निश्चितच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आधी वाचला किंवा ऐकला असेल. स्वयंचलित कार, चॅटबॉट, गीटहब कोपायलट अशी अनेक उत्पादनं आहेत ज्या मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरले जाते. ह्या मध्ये भर पडली आहे ती चॅटजिपीटीची. चॅटजिपीटी एक चॅटबॉट आहे जे अमेरिकेतल्या ओपनएआई या कंपनीने बनविला आहे. हा चॅटबॉट लार्ज लँगवेज मॉडेलवर बनविला गेला आहे म्हणजेच चॅटजीपीटीला मानवी भाषा समजते. तुम्ही थेट या चॅटबॉट बरोबर संभाषण साधू शकता. जसं तुम्ही गूगलच्या सर्चबार मध्ये टाईप करता तसेच चॅटजीपीटीच्या सर्चबार मध्ये प्रश्न टाईप करता येतो फरक इतकाच, गूगल तुम्हाला थेट उत्तर देत नाही पण चॅटजीपीटी देतो. उदाहरण म्हणजे, तुम्ही गूगल ला विचारले “पोहे कसे बनवायचे” तर गूगल तुम्हाला रेसिपी देणार नाही पण गूगल तुम्हाला एका यूट्यूब विडिओ ची लिंक देईल तुम्हाला या यूट्यूब विडिओ वर क्लिक केल्यावर पोहे कसे बनवायचे ते समझेल, चॅटजीपीटीचे असे नाही तो तुम्हाला कुठलीही विडिओ दाखविणार नाही उलट तुम्हाला थेट रेसिपी सांगेल चॅटजीपीटीला शक्य होते ते एलएलएम मॉडेलमुळे. तुम्ही प्रश्न टाईप केल्यावर चॅटजीपीटी आपल्या भल्या मोठ्या डाटाबेसच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मॉडेल्सच्या आधारे तुमच्या समोर रेसिपि लिहून देतो.

काहीजण म्हणतील यात काय नवीन आहे ? किंवा याचा उपयोग काय ? या चॅटजीपीटीचे उपयोग बरेच आहेत. अमेरिकेतल्या व्हार्टन बिझनेस स्कूलच्या एका प्राध्यापकाने सिलॅबस तयार करण्यासाठी, लेक्चरच्या तयारीसाठी चॅटजीपीटीचा वापर केला आहे. याच विद्यापीठातल्या दुसऱ्या प्राध्यापकाने चॅटजीपीटीला एमबीएच्या एका विषयाचा पेपर सोडवायला दिला, त्याचा निकाल चॅटजीपीटीला बी आणि बिप्लस गुण मिळाले. याच कारणाने जगातले अनेक प्राध्यापक चिंताग्रस्त आहेत. चॅटजीपीटीचे फायदे देखील आहेत समजा तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यासाठी तुम्हाला वेबसाईट लागेल ही वेबसाईट तुम्ही चॅटजीपीटी कडून बनवून घेऊ शकता, मी स्वतः हा प्रयोग करून पाहिलेला आहे आणि तो सफलही झाला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही नवीन नाही चॅटबॉट पण नवीन नाहीत पण चॅटजीपीटी वरचढ ठरतो कारण तो तुमच्या जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे मानवी भाषेत देऊ शकतो. कॉम्प्युटर इंजिनीरिंग आणि कोडींगसाठी तर याची फार मदत होणार आहे म्हणूनच याची चर्चा बँक, टेक कंपन्या, तेल कंपन्या सगळेजण करत आहेत.

मायक्रोसॉफ्टने चॅटजीपीटीची क्षमता बघून ओपनएआय मध्ये $१० बिलियनची गुंतवणूक केली आहे. सत्या नाडेला यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, “आजवर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे प्रयोग झाले ते अनेकदा फक्त कॉलेज प्रोजेक्ट्स पुरतेच मर्यादित होते पण चॅटजीपीटीचे तसे नाही” मायक्रोसॉफ्ट चॅटजीपीटीचा उपयोग सध्या त्यांच्या बिंग सर्च आणि मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरमध्ये करून गुगलच्या सर्च इंजिनला आवाहन द्यायचे ठरविले आहे. गूगलनेही हे आवाहन स्वीकारून त्यांच्या बार्डएआय़ (BardAI) वर काम करणं सुरु केलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल सतत असा ग्रह होता की, अजून ५ वर्षांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ येणार, पण ते ५ वर्ष अजून तरी आलेली नाहीत. एआईचे अनेक प्रयोग नेहमीच दोन टोकाचे ठरले सेल्फ ड्रायविंग सारखे प्रोजेक्ट्स अपयशी ठरले तर जे सफल झाले ते प्रोजेक्ट्स काही बहुउपयोगी आणि दिव्य होते असेही नव्हते उदाहरण म्हणजे रेकमेंडेशन अल्गोरिथम किंवा चॅटबॉट पण चॅटजीपीटी हे चित्र बदलू शकतो.

टेक इंडस्ट्रीमध्ये नावीन्य शोध काही नवे नाहीत बेल लॅब्सचा ट्रांजिस्टर पासून ते इंटेलचे मिक्रोकंट्रोलर, आयबीएम/मायक्रोसॉफ्ट/अँपल यांचे कॉम्प्युटर्स नंतर इंटरनेट, डब्लूडब्लूडब्लूने समृद्ध झालेली इंडस्ट्रीने आयफोन आणि क्लाऊड कंप्युटिंगच्या साहाय्याने उंच झेप घेतली आता त्याच भरारीला वेगळं वळण एआई देत आहे आणि चॅटजीपीटी हे त्या दृष्टीने पडलेले एक भक्कम पाऊल आहे

*नाव: शैलेंद्र सुहास शिंदे*
*ई-मेल: shailendras26@iimk.ac.in*
*फोन नंबर: 8605355279*
*संस्था: भारतीय प्रबंध संस्थान, कोझिकोडे (IIM Kozhikode), केरळ 673570*
*पद: विद्यार्थी (एमबीए वर्ष पहिले)*

प्रतिक्रिया व्यक्त करा