बांदा
नट वाचनालय, बांदा यांच्याकडून दिला जाणारा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यंदा डॉ. रुपेश पाटकर यांना काल प्र. श्री. नेरूरकर यांच्या जयंतीदिनी प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना, हा सत्कार म्हणजे माझ्यावरील प्रेमाची पावती असून, मी अनेक पुरस्कार स्वीकारले मात्र, हा सत्कार स्वीकारताना आपण भावूक झाल्याचं डॉ. रुपेश पाटकर यांनी सांगितलं.
यावेळी व्यासपिठावर एस. आर. सावंत, अध्यक्ष नट वाचनालय बांदा, सचिव, राकेश केसरकर, अन्वर खान, अध्यक्ष – ज्येष्ठ नागरिक संघ, प्रकाश पाणदरे, डॉ. रुपेश पाटकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक – निलेश मोरजकर, शंकर नार्वेकर, सौ. स्वप्नीता सावंत, नेरुरकर यांच्या भगिनी पुष्पा वालावलकर आदि उपस्थित होते.
पेशाने मनोविकारतज्ज्ञ असलेले डॉ. पाटकर हे गेली सुमार वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिलेले आहे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीना मोफत उपचार देण्यासोबतच पर्यावरण रक्षण, कामगारांचे प्रश्न, कुमारवयीन मुलांच्या समस्या याबाबत भरीव योगदान देत आहेत.
त्यांनी बाजारू लैंगिक शोषणाचे पीडितासाठी काम करणार्या ‘अन्याय रहित झिंदगी’ या संस्थेसोबत काम केलेले आहे.
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते सातत्याने लिखाण करत असून त्यांची ” माझ्या आईची गोष्ट, एका शिकारीची गोष्ट, ओपन युवर हार्ट, मद्यपाश एक आजार, कुमारांशी संवाद, पर्यावरणीय बुद्धिमत्ता, अर्ज मधील दिवस, भारतीय तत्त्वज्ञानाची गोष्ट, शोध आबे फारीयाचा, शोध धर्मानंदांचा, मनोवेदनांच्या गोष्टी ” वगैरे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.