You are currently viewing नजर

नजर

*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा, निगडी पुणे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*नजर*

नजरभेट घडली
हृदये धडधडली
प्रीतीचा संकेत होता
पापणी फडफडली
-१-
नजरेतून अंतरी
प्रतिमा सखे जडली
मन माझे मोहोरले
स्वप्नी परि ती दडली
-२-
नको दृष्ट ती लागाया
दुष्टांची विखारी छाया
ग्रहण सुखांना नको
नजर हवी काढाया
-३

-बाबू फिलीप डिसोजा
यमुनानगर, निगडी, पुणे-४११०४४

प्रतिक्रिया व्यक्त करा