राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ३८ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
*lकणकवली
“रक्तदान हेच श्रेष्ठदान” अपघात व उपचार प्रसंगी गरजू व्यक्तींना रक्त उपलब्ध व्हावे, युवकांमध्ये रक्तदान करण्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कणकवली कॉलेज कणकवली आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, प्रा. डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रसंगी ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच एनएसएस स्वयंसेवकांनी रक्तदानासंदर्भात जनजागृती केली. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजु, विशेष अधिकारी डॉ. संदीप साळुंखे तसेच विश्वस्त आणि संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश पाटील, प्रा. सागर गावडे, प्रा. विनया रासम, प्रा. अदिती मालपेकर व स्वयंसेवक प्रथमेश शिरसाठ, प्रथमेश घाडी, निखिल पांगम, आकांक्ष पिळणकर, ब्राईन लोबो, शरयू कदम व इतर स्वयंसेवकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.