निधी संकलन करून देणार:मत्री दीपक केसरकर; वैश्य मेळाव्यात मंत्री केसरकर यांचा सत्कार
सावंतवाडी
येथील वैश्य समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वस्तीगृहाच्या पाच खोल्या माझ्या कुटुंबांतर्फे बांधून देण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.दरम्यान त्यासाठी लागणाऱ्या देणगी मी उपलब्ध करून देईन असे आश्वासन श्री केसरकर यांनी यावेळी दिली. ते येथील आयोजित वैश्य समाज मेळाव्यात बोलत होते.
यावेळी वैश्य समाजाच्या मेळाव्याचे उद्घाटन श्री दीपक केसकर यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर श्री केसरकर यांचा वैश्य समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
ते पुढे म्हणालेे, या ठिकाणी समाज सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न आहे. समाजातील बांधवानी सुध्दा एकत्र येणे गरजेचे आहे आणि एकत्र आल्यास कोणतीही शक्ती आपल्याला मागे खेचू शकत नाही. ही वस्तूस्थिती आहे, असे सांगून त्यांनी जिल्ह्यातील वैश्य समाजाच्या महिलांना आपण लवकरच ट्रिप साठी पाठविणार आहोत. त्यासाठी लागणारा खर्च आपण देवू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली शिवसेना युवा नेते संदेश पारकर, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, रमेश बोंद्रे, आदी उपस्थित होते.