महाबळेश्वर मध्ये आयोजन; ५८ नगरपरिषदांनी घेतला स्पर्धेत सहभाग…
सावंतवाडी
महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडी नगर परिषदेच्या संघाने बाजी मारली आहे. अंतिम सामना मोहोळ नगरपरिषद संघासोबत झाला होता. या स्पर्धेमध्ये एकूण ५८ नगरपरिषद व नगरपालिकेच्या संघानी सहभाग दर्शविला होता. त्यांच्या या यशाबद्दल राज्यातील सर्व नगरपरिषदाकडून सावंतवाडी नगर परिषद मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.