महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे राहणार उपस्थित.*
*महाअधिवेशनासाठी अडीज दिवस विशेष रजा मंजुर*
(राज्याध्यक्ष मा.उदयराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यउपाध्यक्ष मा.राजन कोरगांवकर आणि समिती पदाधिकारी यांचे यशस्वी प्रयत्न.)
शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशनाचे महिनाभरापूर्वी बिगुल वाजताच अवघ्या महाराष्ट्रात समिती पाईकांमध्ये उत्साह संचारला असुन गुरुवार दि.१६ जानेवारी २०२३ रोजी सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यात निसर्ग सौदर्यांची खाण असलेल्या वेंगुर्ल्यात राज्य महाअधिवेशन संपन्न होत असताना महाअधिवेशनाची जय्यत आणि आखिव-रेखीव तयारी जोरदार सुरु आहे. पुर्वेकडे टोकाला असलेल्या गडचिरोली ते उत्तरेकडील धुळे,नंदुरबार जिल्हे व उर्वरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पाईकांनी मोठ्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठीची नियोजनबद्ध तयारी सुरु आहे.संघटना पदाधिकारी प्रत्येक आघाडीवर जोमाने जबाबदारी पार पाडत आहेत. महाअधिवेशन यशस्वी आणि अभुतपूर्व होण्यासाठी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यापासून ते नेतृत्व करणाऱ्या राज्यपदाधिकाऱ्यापर्यंत अत्यंत वेगाने आणि नियोजनबध्द झटत आहेत. अधिवेशन यशस्वी होण्यासाठीचा महत्वाचा भाग म्हणजे अधिवेशनकालिन रजा मंजुरी….. यासाठीचे प्रयत्न गेले पंधरा-पाऊण महिनाभर सुरु आहेत.पहिल्या फळीतील पदाधिकारी महाराष्ट्राचे प्रशासकिय मुख्यालय मुंबई येथे गेले दोन दिवस ठाण मांडत मा.मंत्रीमहोदय आणि अधिकारी स्तरावर चिकाटीने प्रयत्न करत (अधिवेशन रजा मंजूर होण्यासंदर्भाने प्रशासनाच्या काही तांत्रिक अडचणी तसेच संघटनांचे नेतेमंडळीमधील दुष्टबुद्धी लोक प्रचंड अडथळा आणत असताना ) किमान रजा मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत रजा मंजूर करून घेण्यात यशस्वी झाले आहेत.तसेच या महाअधिवेशासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांची आवर्जुन उपस्थिती राहणार असुन उपमुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस,केंद्रीय सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योगमंत्री मा.नामदार नारायणराव राणे,ग्रामविकासमंत्री मा.नाम. गिरिषजी महाजन, शिक्षणमंत्री मा.नाम.दिपकजी केसरकर,सार्वजनिक बांधकाममंत्री मा.नाम.रविंद्रजी चव्हाण,उद्योगमंत्री मा.नाम.उदयजी सामंत,बंदरे आणि खनीकर्ममंत्री दादाजी भुसे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.त्याबरोबरच सन्मा.खासदार व आमदार यांचीही उपस्थिती राहणार आहे.*
*अधिवेशन रजा मंजुरी आणि प्रमुख अतिथी उपस्थिती यासाठीचे प्रयत्न राज्य उपाध्यक्ष मा.राजनजी कोरगांवकर यांच्यासोबत राज्य न.पा.म.न.पा.प्रमुख सुधाकर सावंत, राज्यसहसचिव नामदेव जांभवडेकर,रायगड जिल्हानेते किशोर पाटील,सिंधुदुर्ग जिल्हानेते नंदकुमार राणे या पदाधिकाऱ्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले.पुर्वनियोजित अधिवेशन दिमाखात पार पडणार असुन अवघ्या महाराष्ट्रातील सुमारे एक ते दिड लाख पाईक उपस्थित राहत आहेत. त्यामुळे पुनः एकदा सिंधुदुर्ग दुमदुमणार आहे.*
*महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा.नाम.दीपकभाई केसरकर यांच्या विशेष सहकार्याबद्दल विशेष आभार !