You are currently viewing आंगणेवाडीच्या विकासात्मक वाटचालीत नरेश आंगणे यांचे मोठे योगदान..

आंगणेवाडीच्या विकासात्मक वाटचालीत नरेश आंगणे यांचे मोठे योगदान..

विकास मंडळाचे प्रमुख कार्यवाहक मधुकर आंगणे यांचे गौरवोद्गार

 

मालवण / मसुरे :

 

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरेश आंगणे म्हणजे एक कोहिनूर हिरा. आंगणेवाडीच्या जडण घडणीत, विकासात्मक वाटचालीत आंगणेवाडी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नरेश आंगणे यांचे मोठे योगदान आहे. आंगणेवाडी म्हणजे नरेश आंगणे आणि नरेश आंगणे म्हणजेच आंगणेवाडी असं एक समीकरण आहे. मागील अनेक वर्षे आंगणेवाडी मध्ये झालेल्या विविध शासकीय योजना पूर्णत्वास जाण्यात इतरांप्रमाणे मोठे योगदान नरेश आंगणे यांचे होत असे प्रतिपादन आंगणेवाडी विकास मंडळ प्रमुख कार्यवाह मधुकर आंगणे यांनी आंगणेवाडी येथे केले.

आंगणेवाडी येथे जत्रोत्सवानंतर आंगणेवाडी विकास मंडळ व आंगणे कुटुंबीय यांच्या वतीने झालेल्या नाट्यप्रयोग दरम्यान आंगणेवाडी साठी विशेष योगदान दिल्या बद्दल स्थानिक मंडळाचे माजी अध्यक्ष, समाजसेवक, प्रसिद्ध भजनी बुवा, नरेश आंगणे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सदर सन्मानपत्र नरेश आंगणे यांना त्यांच्या घरी जाऊन प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना बाबू आंगणे म्हणाले, “नरेश आंगणे हे आंगणेवाडीचे एक रत्न आहेत. आंगणेवाडीच्या पुण्यभूमी साठी नरेश आंगणे यांचे मोठे योगदान आहे. प्रकृती चांगली नसताना सुद्धा आंगणेवाडीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाची ते फोनद्वारे माहिती घेत असतात. जेष्ठ ग्रामस्थ म्हणून सल्ला देत असतात. प्रचंड आत्मीयता त्यांच्या या कृतीमधून दिसून येते. त्यांचे मार्गदर्शन यापुढील काळात सुद्धा आम्हाला लाभावे,” अशी आई भराडी चरणी प्रार्थना करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी नरेश आंगणे यांनी सन्मानपत्र स्वीकारत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले “आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत आज जो माझा गौरव करण्यात आला आहे हे पाहून मन भारावून गेले आहे. हा सन्मान माझा नसून आजपर्यंत मला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांचा आहे. आजचा सत्कार मी श्री देवी भराडी मातेचा प्रसाद म्हणुन स्वीकारत आहे. या पुढेही या पुण्यभूमीची सेवा माझ्या हातून चांगली घडावी आणि आंगणेवाडीचे नाव देशभर होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.”

सत्कार प्रसंगी आंगणेवाडी विकास मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, काका आंगणे, दिनेश आंगणे, बाबू आंगणे, छोटू आंगणे, नरेंद्र आंगणे, आनंद आंगणे, राजन आंगणे, अनंत आंगणे, प्रदीप आंगणे, विजय आंगणे, प्रसाद आंगणे, शशी आंगणे, विद्या आंगणे, सतीश आंगणे, विशाल आंगणे, संकेत आंगणे, समीर आंगणे, आबा आंगणे, बाळा आंगणे, सचिन आंगणे, विशाल आंगणे आदींसह आंगणे कुटुंबीय उपस्थित होते. आभार गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा