You are currently viewing जरा विसावू या वळणावर

जरा विसावू या वळणावर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जरा विसावू या वळणावर*

*विसावा*

भले बुरे जे घडून गेले
काळासोबत दिले सोडुनी
स्मृतीपटलावर जे कोरले
प्रसंग सारे जपले कवळुनी।।

कधी हुंदके कधी उसासे
हास्यफुलेही आली बहरुनी
आनंदाचे तुषार उडवत
सुगंध दरवळ दिला पसरुनी।।

क्षण सौख्याचे मुठीत धरले
नको जायला केव्हा निसटुनी
भरले डोळे ओघळ गाली
कपोल भिजले काजळ वाहुनी।।

संसाराची धुरा अशी ही
सांभाळाया ना डगमगले
कर्तव्यापरी सजग राहुनी
यशस्वितेचे ध्वज रोविले।।

जीवनाची इतिकर्तव्यता
संध्या समयी कातर हे मन
ज्योत उजळते देवापुढती
विसावता मग त्याला वंदन।।

~~~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा