क्रिकेट स्पर्धा म्हणजे युवकांची समाज बांधणी – ॲड. श्याम गोडकर
वेंगुर्ला
भंडारी मंडळातर्फे ठेवण्यात आली ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे, भंडारी समाजातील युवकांची समाज बांधणी करुन त्यांना प्रोत्साहन देणारी आहे. तेव्हा भंडारी समाजातील युवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपला खेळ वृद्धिग करावा, असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांनी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला आयोजित क्रिकेट स्पर्धा ‘वेंगुर्ला भंडारी चषक २०२३‘चे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला आहे. अॅड.गोडकर म्हणाले की, या स्पर्धेतून भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे अ व ब असे दोन संघ तयार करणार असून सिधुदुर्ग भंडारी महासंघाच्या दि.१४ व १५ फेब्रुवारी रोजी होणा-या क्रिकेट स्पर्धेत हे अ व ब संघ खेळणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी सिधुदुर्ग भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर, सचिव विकास वैद्य, डॉ.आनंद बांदेकर, जयराम वायंगणकर, आनंद केरकर, बाबली वायंगणकर, विलास मांजरेकर, श्रेया मांजरेकर, गजानन गोलतकर, दिपक कोचरेकर, राजू गवंडे, आळवे गुरुजी व खेळाडू उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.सचिन परुळकर यांनी तर आभार सत्यवान साटेलकर यांनी मानले.